वारकऱ्यांसाठी मोफत पाण्याचा टँकर व अल्पोअहार..

आदमापूर येथील संत बाळूमामाचे भाकणूककार व मानकरी गुरुवर्य कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते टँकर पूजन..
काल (22) सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पालखी सासवड मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा लोणी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्त झाला.
यामध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून तिकडे पुणे शेकडो पुणेकर यासाठी सज्ज होते याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षापासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पश्चिम विभाग लिगल हेड प्रमुख एडवोकेट संभाजीराजे थोरवे व माजी नगरसेविका शिवसेना महानगर प्रमुख ( महिला) सौ कल्पनाताई थोरवे यांच्या माध्यमातून वेल्हा तालुका वेल्हा जिल्हा पुणे येथील दिंडी नंबर 88 ह भ प बाळकृष्ण महाराज फणसे या दिंडीला शेवटपर्यंत पुरेल असा मोफत टँकरदरे पाणी पुरवठा व अन्न दान करण्यात येत आहे.
मोफत पाण्याचा टँकरची सेवा काल टँकरचे पूजन संत बाळूमामा महाराज यांचे भाकणूक कार व मानकरी श्री कृष्णांत ढोणे महाराज यांच्या हस्ते पूजन करून टॅंकरला भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला. .
मागील बारा वर्षापासून कै. हनुमंतराव तुकाराम थोरवे कै.ताराबाई हनुमंत थोरवे कै. द्रोपदाबाई प्रतापराव जाधव कै. गोरक्षनाथ प्रतापराव जाधव यांच्या स्मरणार्थ दिंडीसाठी म्हणून मोफत पाण्याचा टँकर व अल्पोपार पुरवण्याची सामाजिक जबाबदारी यांनी स्वीकारली व अविरतपणे सुरू ठेवले असल्याचे एडवोकेट थोरवे यांनी सांगितले.
प्रसंगी ऍडव्होकेट संभाजीराजे थोरवे माजी नगरसेविका व शिवसेना पुणे महानगरप्रमुख (महिला) सौ कल्पनाताई थोरवे गुरुवर्य कृष्णात ढोणे महाराज यांचा सेवक वर्ग परिसरातील महिला भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
