तळजाई येथील चाटे पब्लिक स्कूल व ज्यु.काॅलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

चाटे पब्लिक स्कूल व ज्यु.काॅलेज तळजाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने तसेच रिमझिम पावसाच्या मंत्रमुग्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी चाटे पब्लिक स्कूल & ज्यु.कॉलेज चे संस्थापक प्रा.फुलचंद चाटे, सचिव वैशालीताई चाटे, योग प्रशिक्षक वाल्मिक मांडवडे, प्रियोत्तमा मांडवडे, आदिती मांडवडे व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी संघ, सहजयोग पुणे संघाचे प्रमुख विलास कडू पाटील, ज्योती सनस, मृदुला बोराले, सिमा देशमुख, तृप्ती टोके, संगीता शहापुरे, जयश्री, रेणुका आदी उपस्थिती होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन व वंदना स्तोत्राने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा सत्रात भाग घेतला.‘सूर्यनमस्कार’, ‘ताडासन, वज्रासन, पद्मासन’ व इतर अनेक आसनांचे सादरीकरण करण्यात आले.
प्रा. फुलचंद चाटे सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योग हा आपल्या संस्कृतीचा आत्मा असून विद्यार्थ्यांनी मोबाईल संस्कृती पासुन दूर रहात नियमित योगाचा सराव करून शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करावे. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असल्याने अभ्यासा बरोबर, शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक सर्वांगीण विकास होत असतो असे सांगताना योगासन कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.
इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका नवनीत कौर, सी.बी.एस.ई. विभागाचे मुख्याध्यापक प्रा.रणजीत जगताप, क्रिडा शिक्षक ओंकार खिलारे, राजेंद्र वाडकर यांनी यशस्वीपणे कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेश्मा पठाण, आभारप्रदर्शन लक्ष्मी बोरबंडे यांनी केले.
