सकल्पच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत पाणी व खाद्यपदार्थ

कात्रज, -:
संकल्प प्रतिष्ठाण व संकल्प ग्रुप (कात्रज, पुणे, महा-राज्य ) आयोजीत संकल्प वारीचा या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून 22 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी उरुळी देवाची, सासवड रोड, (पुणे) येथे अनेक वर्षांची परंपरा प्रमाणे बिसलेरी पाणी बॉटल्स, राजगिरा वडी व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन संकल्प प्रतिष्ठाण चे अध्यक्ष संजय कपिले यांच्या मार्गदर्शाखाली करण्यात आले होते. संकल्प वारीचा या सामाजिक उपक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व उपाध्यक्ष संदिप धर्माधिकारी व सहकारी यांनी हा सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
मोफत पाणी व खावू वाटप प्रसंगी ॲडव्होकेट अजय कपिले, अमित तारू, संतोष पवार, कुमार वरे, मयूर गिरे, विशाल हुशारे, ऋषिकेश डिंबळे, अविनाश राजवाडे, साहिल कपिले, वसीम बागवान, अमित कोंढाळकर, भरत कटके, पियुष कपिले, प्रविण काटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
