
मुंबई -:दादर सांस्कृतिक मंच दादर या संस्थेने काल दि.20/08/2025 रोजी नुकत्याच पार पडलेल्या 78 व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून आपल्या संस्थेच्या सभासदांसाठी ” शूरा मी वंदिले” हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात सैन्यदलाच्या सेवेत असतांना विविध सीमांवर कार्य केलेले व सेवानिवृत्त झालेले नायक श्री. विजय कातोरे (नाशिक), हवालदार श्री.बजरंग निंबाळकर (पुणे), हुतात्मा नारायण भोंदे यांच्या वीरपत्नी सौ. अंबिका नारायण भाेंदे (अहिल्यानगर)यांच्यासह एक सैनिक माता म्हणून माझाही यथोचित गौरव करण्यात आला व आम्हा चौघानांही आपल्या मनातील भावना उपस्थितांपर्यंत पोहोचविता आल्या . त्याबद्दल दादर सांस्कृतिक मंचचे मनापासून आभार व्यक्त करते. खूप काही बोलायचे होते, खूप काही सांगायचे होते पण वेळेच्या बंधनामुळे ‘खूप काही गेले सांगायचे राहून ‘अशी अवस्था सर्वांचीच झाली. असो.दादर सांस्कृतिक मंचच्या आयोजकांनी हा कार्यक्रम अगदी सुनियोजित पध्दतीने आखला होताच परंतु त्यात आखीव रेखीव पध्दतीने साकारण्याची जबाबदारी निवेदिका शिबानी जोशी यांनी अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडली. गायिका मधुरा जोशी हिनेही देशभक्ती पर गीते अगदी तन्मयतेने सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.गेले दोन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडून सुध्दा उपस्थिती देखील उल्लेखनीय होती. यासाठी उपस्थित श्रोत्यांचेही कौतुक.हा कार्यक्रम घडवून आणण्याचे श्रेय दादर सांस्कृतिक मंचच्या कार्यवाह उत्तराताई मोने ,अमेय मोने यांच्यासह कमिटी सदस्य उमाताई कुळकर्णी यांनाही जाते. यांचेही खास कौतुक..असा हा आगळा वेगळा कार्यक्रम दादर सांस्कृतिक मंचच्या सभासदांपर्यत पोहोचवून आम्हाला देखील त्यांच्यापर्यत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचेच मनापासुन पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आभार मानले
